सामजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद शिंदे यांचा उपक्रम
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य तथा येथील सामाजिक कार्यकर्ते गुरुप्रसाद दिपक शिंदे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज मंगळवार २६ मार्च २०२५ रोजी नुकताच संपूर्ण महाराष्ट्राभर गाजत असलेला व छ.संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर आधारित असलेला “छावा” हा ऐतीहासिक सिनेमा येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांना कणकवलीच्या लक्ष्मी चित्र मंदिर टॉकीज मध्ये मोफत दाखविला.
यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य व मोफत सिनेमा पुरस्कर्ते गुरूप्रसाद शिंदे, खारेपाटण केंद्र शाळेचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, गौरी शिंदे, उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, शाळेचे शिक्षक मिलिंद सरकटे धुमक, अबिदा काझी, आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळा नं. १ च्या सुमारे ८० विद्यार्थ्यानी “छावा” या सिनेमाचा कणकवली येथील लक्ष्मी चित्र मंदिर मध्ये मोफत पाहण्याचा आस्वाद घेतला.खारेपाटण जि.प.केंद्र शाळेच्या वतीने दानशूर व्यक्तिमत्व गुरुप्रसाद शिंदे यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. तर शालेय विद्यार्थ्यांना मोफत “छावा” सिनेमा दाखविल्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
















