कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे गावचे रहिवासी विद्याधर लक्ष्मण पोयेकर (वय ७७, रा.कोष्टीवाडी) यांचे मंगळवारी 25 रोजी रात्री ११ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. वरवडे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर 26 मार्च रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गेली अनेक वर्षे त्यांनी वरवडे गावचे रेशन दुकान जबाबदारीने सांभाळले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.












