इस्रो सफरी वरून आलेल्या विद्यार्थ्यांचे कणकवली शाळा क्र. 3 च्या वतीने स्वागत

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील सदगुरू भालचंद्र महाराज विद्यालय जि प शाळा कणकवली क्रमांक तीन येथे वरद उदय बाक्रे व सम्यक चंद्रकांत पुरळकर या विद्यार्थ्यांचे शाळा कणकवली क्रमांक तीन व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने इस्रो सफर करून परत आल्याबद्दल स्वागत करण्यात आले सन 2024 मध्ये शाळा कणकवली क्रमांक तीन येथे सातवीत शिकत असताना डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत वरद उदय बाक्रे हा तीनशे पैकी 248 गुण मिळवून कणकवली तालुक्यात प्रथम आला होता तर सम्यक चंद्रकांत पुरळकर हा 300 पैकी 222 गुण मिळवून कणकवली तालुक्यात तृतीयआला होता या विद्यार्थ्यांना प्रतिभा कोतवाल यांनी गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे तर अक्षया राणे यांनी मराठी व इंग्रजी या विषयाचे मार्गदर्शन केले होते इस्रो सहलीसाठी पात्र ठरल्यामुळे त्यांची सहल दिनांक 18 एप्रिल 2025 ते 22 एप्रिल 2025 या दरम्यान विमानाने इस्त्रो सेंटर येथे जाऊन आली ही शाळेसाठी गौरवास्पद बाब आहे आणि म्हणून सहलीवरून परतल्यावर त्यांचा शाळेच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावेळी वरद बाक्रे आणि सम्यक पुरळकर यांनी दोघांनी इस्रोसहली दरम्यान आलेले अनुभव कथन केले याप्रसंगी पुरळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या मुलांच्या यशातून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनीही अधिकाधिक अभ्यास करावा आणि शाळेचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षया राणे व सर्व सहकारी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण, उपाध्यक्ष सायली राणे, विजयकुमार शिंदे संपदा कांबळे, अश्विनी राणे, साक्षी राणे,गायत्री नाईक व यशवंत चव्हाण उपस्थित होते

error: Content is protected !!