जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2025 जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : आधुनिक परिचर्येच्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म दिवस 12 मे हा जागतिक परिचारीका दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आरोग्य सेवेत अल्लेखनिय कार्य करणा-या कार्यरत परिचारीकांना त्यांनी केलेल्या कामाचा गौरव म्हणुन फ्लोरेन्स नाईटिंगेल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यानुसार उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य सेविका व आरोग्य सहाय्यिका तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय स्तरावर अधिपरिचारीका/परिसेविका या संवर्गातून प्रत्येकी तीन याप्रमाणे जिल्हास्तरावर फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्याची घोषणा करण्यात आली आहे.

यामध्ये आरोग्य सेविका संवर्गातून प्रथम क्रमांक हिराबाई जाधव प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल (5000 रुपये), दिव्तीय क्रमांक शुभदा सावंत प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली (4000 रुपये), तृतीय क्रमांक भारती सुर्वे प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल (3000 रुपये) व आरोग्य सहाय्यिका संवर्गातून प्रथम क्रमांक सविता डामरे प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण (5000 रुपये), दिव्तीय क्रमांक पी पी नेवगी प्राथमिक आरोग्य केंद्र वालावल (4000 रुपये), तृतीय क्रमांक हर्षदा भिसेकर प्राथमिक आरोग्य केंद्र कसाल (3000 रुपये) यांना जाहिर करण्यात आलेला आहे. तसेच अधिपरिचारीका/परिसेविका संवर्गातून प्रथम क्रमांक नेहा गोसावी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग (5000 रुपये), दिव्तीय क्रमांक प्रांजली परब जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग (4000 रुपये), तृतीय क्रमांक श्रद्धा टिळवे जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग (3000 रुपये) यांना जाहिर करण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!