माध्यमिक विद्यामंदिर असरोंडी प्रशालेची कु.स्वप्नाली शशांक कोकरे NMMS परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये

मालवण (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये  दि.२२/१२/२०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विदयार्थ्यासाठी शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली त्या मध्ये माध्यमिक विदयामंदिर,असरोंडी,ता.मालवण जि.सिंधुदुर्ग या प्रशालेची विदयार्थीनी कुमारी स्वप्नाली शशांक कोकरे  हिने NT क प्रवर्गातून जिल्ह्यात  03 रा क्रमांक प्राप्त केला असून,तिला प्रत्येक महिन्यास 1000 रु.प्रमाणे इ. 9वी ते इ.12वी पर्यत  एकूण 48000 रु. शिष्यवृत्ती मिळणार आहे.

या यशाबद्दल कुमारी स्वप्नाली शशांक कोकरे हिचे संस्था अध्यक्ष विजय सावंत, संस्था सचिव प्रकाश सावंत,सर्व संचालक मंडळ सदस्य,मुख्याध्यापक सुशांत पाटील,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!