कणकवली (प्रतिनिधी) : आम्ही मालवणी फेसबुक समूह आयोजित मालवणी एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी मीरा रोड येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली.
मालवणी भाषा प्रेमींचा अंतिम फेरीतील या सहा एकांकिका पहायला उदंड प्रतिसाद लाभला होता.दुपारी ३.३० पासून उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या महाअंतिम सोहळ्याला रात्री बारा वाजेपर्यंत रसिक प्रेक्षक हजर होते.मालवणी एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण सहा एकांकिका सादर झाल्या.त्यामधून अमरहिंद मंडळ दादर या संस्थेंने सादर केलेली ” रेशन कार्ड “ही एकांकिका या वर्षीची सर्वोत्कृष्ट मालवणी एकांकिका ठरली.द्वितीय एकांकीकेचा मान शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठानच्या ” भू.भू, एकांकिकेला मिळाला तर कणकवलीची ” काव काव ” ने तृतीय क्रमांक पटकावला.
सृजन द क्रिएशन “या संस्थेने सादर केलेली ” फ्रिडम अॅट मिडनाईट ” ( Fridom at midnight) एकांकिकेला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेचा पुरस्कार देण्यात आला.या सहा एकांकिकांचे परिक्षण लेखक विजय टाकळे,अभिनेते प्रदीप तोंडवळकर,आणि अभिनेत्री माधवी जुवेकर ( लोके ) यांनी केले. लेखक, दिग्दर्शक ,हास्यजत्रा कार सचिन गोस्वामी, अभिनेते पंढरी कांबळे ( पॅडी ) तिन्ही मान्यवर परिक्षक ,व मिरा रोड मधील सामाजिक कार्यकर्ते दाभोळकर,शेट्टी,गोसावी यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याला नाट्य लेखक,दिग्दर्शक ,आणि नाट्य प्रशिक्षक संभाजी सावंत सर ,ज्येष्ठ अभिनेते प्रदीप कबरे,साहित्यिक डॅा.महेश केळुस्कर,नाट्यप्रशिक्षक , अशोक पावसकर,चित्रा पावसकर,अभिनेते रोहन पेडणेकर,सचीन वळंजू,अंकुर वाढवे,लेखक ,गजालकार प्रकाश सरवणकर,डॅा.मिलिंद दळवी,सिने दिग्दर्शक दिनेश गायकवाड इत्यादी मान्यवर या सोहळ्याला हजर होते.
मालवणी एकांकिका स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून या वर्षीची ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्री.सतेज दळवी,संचालक,आम्ही मालवणी फेसबुक समूहाचे संचालक, श्रावणी सावंत,कार्यवाह विठ्ठल सावंत, प्रदीप तोंडवळकर, आयोजन समितीचे आशिष राणे,सुमित राणे,अमित चाळके,वैशाली राणे,नीलेश सावंत,सौरभ चव्हाण,आणि अजय गावडे यांनी मेहनत घेतली होती
मालवणी एकांकिका स्पर्धा २०२५ चा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे.
१ ) सर्वोकृष्ट एकांकिका प्रथम-
रेशन कार्ड
२) सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय-
भू भू
३) सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय-
काव काव”
सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका-
” फ्रिडम अॅट मिडनाईट
सर्वोत्कृष्ट लेखक
१)प्रशांत निगडे – भू भू
२) नितीन परब – मिरग
सर्वोकृष्ट दिग्दर्शक
१) प्रथमेश पवार – रेशन कार्ड
२)प्रशांत निगडे – भू भू
सर्वोत्कृष्ट अभिनेता
१) ओंकार तेली – भू भू
२) सत्यवान गावकर – काव काव
३) नितीन परब – मिरग
सर्वोकृष्ट अभिनेत्री
१) प्रियांका जाधव -रेशन कार्ड,
२) ऋतुजा लाड -भू भू
३) धनश्री मनगुटकर – ती ” चा अस्तित्व.
सर्वोकृष्ट नेपथ्य
१) यश कारंडे – मिरग,
सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना
१) संजय तोडणकर- रेशन कार्ड
सर्वोत्कृष्ट संगीत
१) आनंद दिपनाईक – तिचा ” अस्तित्व.
सर्वोकृष्ट विनोदी अभिनेता
१) चिंतन लांबे
सर्वोकृष्ट अभिनेत्री
१) गुलाब लाड – फ्रिडम अॅट मिडनाईट.
सर्वोत्कृष्ट मालवणी उच्चार
प्रतिक ठोंबरे ( काव काव)
( ऋषी देसाई पुरस्कृत)