तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचा पक्षपाती कारभार

सखोल चौकशीच्या मागणीसाठी तारकर्ली येथील टीकम कुटुंबीयांचे आमरण उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तारकर्ली काळेथर ग्रामपंचायतीचा पक्षपाती कारभार सुरू असून या ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी व्हावी या मागणीसाठी तारकर्ली येथील अनिल टिकम यांनी जिल्हा परिषद समोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

याबाबतचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.तारकर्ली काळेथर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत सदस्य आणि अन्य नागरिकांनी घरांचे वाढीव बांधकाम केले आहे. असे असतानाही या ग्रामपंचायतीने सर्व्हे नंबर ४८११५ मधील घर नंबर २०१ च्या वाढीव बांधकामाची तोडफोड करून नुकसान केले आहे. ही कारवाई म्हणजे ग्रामपयतीची पक्षपाती कारवाई आहे. सर्व घरांच्या क्षेत्रफळात अनधिकृत वाढीव बांधकामे करण्यात आलेली असताना सर्वांवर एकाच पद्धतीने कारवाई होणे आवश्यक असतेवेळी आपल्या घराचे अतिक्रमण कसे ठरविले या सर्व गैरकारभाराची चौकशी करण्याल यावी. ग्रा. पं. कर्मचारी, लिपिक आणि शिपाई  या पदावर सेवा बजावत असते वेळी दिवाबती कर्मचारी नोटीस कसे बजावणी करतात याबाबत चौकशी करण्यात यावी, तसेच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. घर क्रमांक २०१ बाबत अतिक्रमण अथवा वाढीव बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्याचाबत आम्हाला बजावण्यात आलेल्या नोटीसी सह ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व वाढीव बांधकामांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेल्या संपूर्ण अहवाल, कागदपत्रे, शासन निर्णयासह त्वरित देण्यात यावी या मागण्यांसाठी तारकर्ली येथील अनिल टिकम यांनी जिल्हा परिषद समोर कुटुंबासमवेत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

error: Content is protected !!