क्रिएशन ग्रुप मुंबई तर्फे चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळावा संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : तारकर्ली येथील नयनरम्य समुद्रकिनारी मालवण किल्याच्या समोर असलेल्या शासकीय मत्स्य व्यवसाय शाळेत क्रियेशन गृप , गोरेगाव,मुंबई तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शांताराम गिरप( गोरेगाव) यांच्या सुविद्य पत्नी शैला शांताराम गिरप यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला होता. शाळेतील ३० विद्यार्थ्यांना रंगपेट्यांचे वाटप करण्यात आले.या बक्षीस वितरण समारंभात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्ध्यानी विविध करमणुकीचे कार्यक्रम यशस्वीरित्या सादर केले. पालकांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
शांताराम गिरप यांचे शाळेच्या वतीने आणि शालेय समितीच्या वतीने आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यां मधील कलागुणांचा विकास व्हावा त्यांना वाव मिळावा आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी असे उपक्रम आयोजित करण्यात येतात.सामाजिक हितासाठी गिरप यांनी देणगीच्या रुपाने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य असून ,मोलाचा आहे आणि वाखाणण्या जोगा असाच आहे.आशा पद्मकुमार येल्लापुरकर. यांनी आभार मानले.













