श्री राम नामाच्या गजरात चिंदर रामेश्वर मंदिर येथे राम नवमी उत्सव भक्तीभावाने साजरा
आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर येथे आज परंपरेने राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला. सकाळी विधिवत पूजेनंतर दुपारी ह.भ.प साने बुवा यांचे मंत्रमुग्ध करणारे किर्तन, पाळणा श्री रामांची आरती लक्षणीय ठरली. भक्तगणानी प्रभू श्री रामांनवर चाफ्याच्या फुलांचा प्रातिनिधीक स्वरुपात वर्षाव केला. भाविक भक्तगण यावेळी श्री राम जय राम जय जय राम गजरात न्हावून निघाले होते.











