जलजीवनज योजनेच्या लाभापासून वंचित ; संबंधितांवर योग्य ती कारवाई करा 

वायरी बांधवाडी येथील मिठबावकर कुटुंबीयांचे जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना “हर घर जल” योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे.याबाबत लक्ष वेधन्यासाठी तसेच  याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी वायरी बांधवाडी (तारकर्ली )येथील काशीबाई मिठबावकर यांच्यासह ग्रामस्थांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत “हर घर नल” योजनेपासून तारकर्ली बांधवाडी येथील काशीबाई सखाराम मिठगावकर (वय वर्ष ८५ ),शीला भिजाजी मिठगावकर (वय वर्ष ७०) यांच्यासह भिसाजी मिठबावकर, श्वेता मिठगावकर, चिन्मय मिठगावकर, यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करत आज पासून जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अर्जदार वयोवृद्ध ,ज्येष्ठ नागरिक असून वायरी बाधवाडी येथे ग्रामपंचायत तारकर्ली काळेथरच्या कार्यक्षेत्रात कुटुंबीयांसमवेत वडिलोपार्जित घरात राहत आहोत. मात्र भारत सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेच्या हर घर जल या घोषवाक्यानुसार ग्रामपंचायत तारकर्ली काळेथरकडे सन २०२३ सालापासून वेळोवेळी नळ कनेक्शन मिळण्याकरिता अर्ज, निवेदने सादर केलेली आहेत . याबाबत कायदेशीर हरकत, लेखी हरकत अथवा न्यायालयीन आदेश असल्यास त्याबाबत सर्व कागदपत्रे नळ कनेक्शन दिले जाणार अथवा नाही असा समर्पक खुलासा मागितला असता आज पर्यंत समर्पक उत्तर देण्यास ग्रामपंचयती कडून  टाळाटाळ केली जात आहे. ग्रामपंचायत ने आमच्या कुटुंबीयांना नळ पाणी योजना कनेक्शन अंतर्गत लाभांपासून वंचित ठेवलेले आहे. याबाबत तात्काळ योग्य ती ठोस कारवाई करावी तसेच या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या मागणीसाठी आजपासून जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

error: Content is protected !!