वैभववाडी शिवसेनेच्यावतीने खांबाळे येथे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका वैभववाडी शिवसेनेच्यावतीने खांबाळे येथे दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात संपूर्ण शारिरीक तपासणी अ ॲक्युप्रेशर व फिजीओथेरेपी उपचार शिबीर संगणकीय ऑटोमॅटिकट जर्मन स्कॅनिंग पद्धती. यामध्ये,ECG तपासणी, हृदय व मेंदूच्या रक्त वाहिन्यांची, कार्यक्षमता व हिमोग्लोबीन आणि ब्लड प्रेशर,डर्मास्कोपी त्वचेची तपासणी, पचनसंस्थेची कार्यक्षमता,लिवर कार्यक्षमता
ऑटोस्कोपी कानाची तपासणी,ब्लड शुगर,ऑफथाल्मोस्पी डोळे तपासणी,चॅलन्स आणि कोलॅटरल्स,मिनरल आणि ट्रेस मिनरल, रक्तातील चरबीचे प्रमाण, जीवनसत्त्व मोठे आतड्यांचे आरोग्य,अॅमिनो अॅसिड थायरॉईड कार्यक्षमता,बेसिक फिजिकल क्वालिटी,अशा विविध प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.या आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन उबाठाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.











