आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरण कालव्याचे पाणी देणार

धरणग्रस्त कृती समितीला पाटबंधारे अधीक्षक अभियंता पाटील यांचे आश्वासन

वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे भोम पुनर्वसन गावठाणाला अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी देणे यासह पुनर्वसन गावाठाणातील समस्या सोडविण्याचे आश्वासन मध्यम पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांनी अरुणा धरणग्रस्तांच्या कृती समितीला दिले.

अरुणा धरणग्रस्थानच्या कृती समिती समवेत अधीक्षक अभियंता यांच्या ओरोस  येतील दालनात झालेल्या बैठकीत हे आश्वासन दिले. यावेळी कार्यकारी अभियंता हर्षल यादव, उपभियंता अभय मगरे, सहायक अभियंता विजयकुमार भंगर्गी, श्री. बोन्द्रे तसेच धरणग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी रंगनाथ नागप आकाराम नागप डॉ.जगन्नाथ जामदार,अभय कांबळे श्री. तळेकर, श्री पडिलकर, शिवराम जाधव तुकाराम मोरे  आदी उपस्थित होते.

अरुणा धरणाच्या कालव्याचे पाणी आखवणे भोम नागपवाडी पुनर्वसन गावठाणाला दयावे अशी मागणी सुरुवातीपासून करूनही त्याकडे पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त झालेल्या धरणग्रस्थानी हेत,तिरवडे, मांगवली येथे सुरू असलेले कालव्याचे काम बंद पाडले होते.  याची दखल घेत अधीक्षक अभियंता श्री पाटील यांनी धरणग्रस्तांच्या कृती समिती सोबत बैठक घेतली. या बैठकीत कालव्याचे पाणी पुनर्वसन गावठाणाला देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसा प्रस्ताव तयार करून त्याची मंजुरी घेण्यात येईल. असे अधीक्षक अभियंता पाटील यांनी सांगितले.

तसेच पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधामध्ये अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाईट, क्रिडांगण, यासह पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येत असलेले कामे करण्यासाठी आम्ही तयार आहोत. या कामासाठी आम्ही निधी उपलब्ध करून देण्यास तयार आहोत ती कामे एकतर जिल्हा परिषदेने करावीत किंवा ती कामे आम्हाला करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून हे कामे मार्गी लागतील यासाठी आम्ही जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करीत असल्याचे कार्यकारी अभियंता हर्षल यादव यांनी सांगितले.

त्यावेळी अपात्र ठरवलेल्या निवासी भूखंड धारकांना पात्र करण्यासाठी शासन स्तरावर पाच वर्षा पूर्वी प्रस्ताव करण्यात आला आहे. त्या संदर्भात आपल्याकडून पाठपुरावा होणे आवश्यक आहे. मात्र तो होताना दिसत नाही. तसेच काही पात्र लाभार्थ्यांना अद्याप भूखंड वाटप करण्यात आलेले नाही त्यांना भूखंड वाटप करावे असे मागणी केली.यावर अधीक्षक अभियंता श्री पाटील यांनी शासन स्तरावर त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

शेत जमिनीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना शेतजमी उपलब्ध करून द्यावी . तसेच जोपर्यंत शेत जमीन मिळत नाही तोपर्यंत धरणग्रस्तांना निर्वाह भत्ता देण्यात यावा. अशी मागणी धर्मग्रस्तांकडून करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी चालू निर्वाह भत्ता आलेला आहे. लवकरच त्याचे वितरण करण्यात येईल. तर पर्यायी शेत जमीन देण्यासाठी लाभ क्षेत्रातील किती जमीन उपलब्ध आहे. याची माहिती दया. तर पर्यायी जमीन उपलब्ध होत नसेल तर त्याबद्दल्यात एक रक्कमी अनुदान दया. अशी मागणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

पुनर्वसन गावठाणतील ग्रामपंचायत कार्यालयासाठी ग्राम सचिवलायचा प्रस्ताव करण्यात आला आहे. असे कार्यकारी अभियंता यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.
यावेळी रिंग रोड साठी संपत्ती झालेल्या जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला मिळावा. तिने गावठाणात जागा निश्चिती करून गार्डन बनवावे.

धरणाच्या बुडीत क्षेत्रासाठी पूर्वी संपादित केलेल्या जमिनीच्या बाहेर धरणाचे पाणी जात असल्यामुळे ती जमीन संपादित करावी व त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली. याबाबत महसूल विभागाकडून आवश्यक ती माहिती घेऊन संपादनाच्या बाहेर पाणी जात असेल तर ती जमीन संपादित करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले..

error: Content is protected !!