जिल्हा परिषद सीईओ खेबूडकर यांच्या हस्ते कोळोशी ग्रामपंचायत चा सत्कार

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन कार्याची घेतली दखल

कणकवली (प्रतिनीधी) : राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने ग्रामपंचायत कोळोशीचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन 2023/24 मध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मध्ये उल्लेखनीय कामाबद्दल मा.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच श्री.अतुल गुरव व ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे यांनी हा सत्कार स्वीकारला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद मधील विविध अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सन्मानप्राप्त ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!