मानसशास्त्रीय कसोट्याद्वारे निशुल्क समुपदेशन वर्गांचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्या व मुलाखत याद्वारे समुपदेशकांमार्फत करिअर विषयक निःशुल्क समुपदेशन वर्गाचे आयोजन खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय येथे दि.२६ व २७ एप्रिल २०२५ रोजी करण्या आले असून याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप यांनी केले आहे.
या करिअर विषयक समुपदेशन वर्गात सहभाग घेण्यासाठी व नाव नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांना लिंक देण्यात आलेली असून सदर समुपदेशनासाठी विषय साधन व्यक्तींची तालुका नोडल अधिकारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ६ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या समुदेशन वर्गासाठी तीनही तालुक्यातून विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून सुमारे २३२ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपली ऑनलाईन नाव नोंदणी केलेली आहे. हे समुपदेशन वर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन टप्प्यात घेण्यात येणार असून पहिला टप्प्यातील स्मपुदेशन वर्गाचा शुभारंभ खारेपाटण हायकुल येथे दि.२६ व २७ एप्रिल २०२५ रोजी संपन्न होणार आहे.तर सदर समुपदेशन वर्गाचे नियोजन खालील प्रमाणे ठरविण्यात आले आहे.——
टप्पा क्र.1. दिनांक २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी देवगड, कणकवली व वैभववाडी तालुक्यांसाठी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथे होणार आहे. यासाठी समुपदेशक म्हणून श्री श्री.संजय सानप (प्रमुख),श्री. भीमराव येडगे श्री सुभाष विणकर,श्री सतीश गावकर यांची मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.तसेच या समुपदेशनासाठी येणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी प्रशासनातर्फे खालील सूचना देण्यात आलेल्या आहेत.
१) सदर चाचण्या व समुपदेशन हे निशुल्क आहे.२)विद्यार्थी समुपदेशन निश्चित केलेल्या ठिकाणावर उपस्थित ठेवण्याची जबाबदारी ही स्वतः विद्यार्थी ,पालक व मुख्याध्यापक यांची असेल.३) समुपदेशन केंद्रावर सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत उपस्थित रहावे.
४)प्रवास व जेवणाची व्यवस्था विद्यार्थ्यांनी स्वतः करावी.
५/) समुपदेशनासाठी दुसऱ्या दिवशी पालक उपस्थित राहिल्यास पालकांना मार्गदर्शन व त्यांचे शंका निरसन करता येनार आहे.
सदर समुपदेशन वर्गाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे जन आवाहन सिंधुदुर्ग जजिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती कविता शिंपी मॅडम व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, श्री राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.












