शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रथमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हानियोजन मधून खासदार विनायक राऊत यांच्या शिफारसीने मंजूर झालेल्या ग्रामीण मार्ग नाटळ हुमलेटेंब ते विकासवाडी रस्त्याचे भूमीपूजन नाटळ ग्रामपंचायत सदस्य रमाकांत घाडीगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत, उद्योगपती अविनाश सावंत, सचिन सावंत, निलेश सावंत, प्रकाश सावंत, मुन्ना तेली, बुधाजी वायंगणकर, विनायक गावकर, राजेश गावकर, अनिकेत गावकर, दीपेश डोंगरे, श्री. भोगले आदि ग्रामस्थ उपस्थित होते.












