‘श्री राधाकृष्ण संगीत साधना व स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांचा संयुक्त उपक्रम
कुडाळ (प्रतिनिधी) : हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत हा आपल्या देशाचा अमुल्य असा ठेवा आहे. आपल्या अभिजात शास्त्रीय संगीताने तर जागतिक संगीत पटलावर आपला ठसा उमटविला आहे. भौतिक सुखाबरोबरच आत्मिक व पारलौकिक समाधान देण्याची ताकद यामध्ये आहे. या अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा व त्यासोबतच त्यावर आधारीत व मराठी रसिक मनाला मोहिनी घालणारे ‘मराठी नाट्यसंगीत’ याचा प्रचार व प्रसार आपल्या जिल्ह्यात व्हावा, त्याची आवड तरूण वर्गामध्ये निर्माण व्हावी, उदयोन्मुख कलाकारांना रसिकांसमोर आणून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून द्यावे या उद्देशाने ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ आणि ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगांव’ यांच्या संयुक्त विद्यमाने “राधाकृष्ण चषक २०२३” या सांगितिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवा अंतर्गत ‘शास्त्रीय गायन स्पर्धा (हिदुस्थानी ख्याल)’ रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी दु. ३.०० वा. संपन्न होणार असून हि स्पर्धा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख ₹5501/- व आकर्षक राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख ₹3501/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख ₹ 2501/- व सन्मानचिन्ह. तसेच उत्तेजनार्थ प्रथम रोख ₹ 1501/- व उत्तेजनार्थ द्वितीय रोख ₹ 1101/- देण्यात येतील. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
तर ‘सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा’ छोटा गट आणि मोठा गट अशी दोन गटात आयोजित करण्यात आली असून ती सोमवार दि. ०१ मे २०२३ रोजी दु. ठीक 3.00 सुरू होईल. हि स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. छोट्या गटासाठी प्रथम पारितोषिक रोख ₹3001/- व आकर्षक राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख ₹ 2001/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख ₹1001/ व सन्मानचिन्ह याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक रोख ₹ 701/- तर मोठ्या गटासाठी प्रथम पारितोषिक रोख ₹5001/- व आकर्षक राधाकृष्ण चषक, द्वितीय पारितोषिक रोख ₹3001/- व सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रोख ₹2001/- व सन्मानचिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिक रोख ₹1001 देण्यात येईल.
श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगांव ता. सावंतवाडी येथे हि संपन्न होणार आहे. स्पर्धकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी श्री हेमंत दळवी 9423585792 यांचेशी संपर्क साधावा. जिल्हाभरातील सर्व शास्त्रीय व नाट्यसंगीत प्रेमींनी यावेळी उपस्थित राहून हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन दोन्ही मंडळांच्या वतीने करण्यात येत आहे.