शेती शिक्षणाला ग्रामीण अनुभवाची जोड

RAWE साठी कृषी कृषिकन्या वेतोरे – पालकरवाडी मध्ये दाखल…!

आचरा (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, किर्लोस ओरोस, जि. सिंधुदुर्ग येशील अंतिम वर्षातील विद्यार्थिनींनी READY (RAWE) (ग्रामीण शेती कार्यानुभव) कार्यक्र‌मासाठी वेतोरे पालकरवाडीमध्ये प्रवेश केला असून, आगामी आठवड्यांमध्ये त्या गावामध्ये विविध कृषि -विषयक उपक्रम राबवणार आहेत.

उपक्रम जसे की, शेतकऱ्यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानचा प्रसार करणे, शेतक-यांना मार्गदर्शन करणे, पारंपारीक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्षलागवड करणे, कृषी विषयक कार्यशाला घेणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, बचतगटांना मार्गदर्शन करणे. शाळांमध्ये क्रिडा स्पर्धाचे आयोजन करणे, गावातील सामाजिक, धार्मिक कार्यात सह‌भाग घेणे.

या उपक्रमांसाठी ब्रिगे. सुधीर सावंत, प्राचार्य डॉ. एस. एस भेंडे, उपप्राचार्य तसेच कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रसाद ओगले, प्रा. परूळेकर, प्रा. गायकी, प्रा. पाताडे, प्रा. पाटणकर, प्रा. वारंग, प्रा. राणे, ता. भोगटे, लाभले आहे. प्रा. परकार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

पालकरवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव पाटील व ग्रामस्थांनी कु. मंजिली पडवळ कु. निती रेडकर, कु. तन्वी देसाई, कु. गायत्री डिचोलकर या कृषिकन्यांचे आनंदाने स्वागत केले असून शेतीविषयक नव्या कल्पनांची आणि ज्ञानाची त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.

RAWE विद्यार्थिनींचे प्रात्यक्षिक संवेदनशीलता, आणि समूह कार्यक्षमता शिक्षण, यांना बळकटी मिळणार आहे.

error: Content is protected !!