जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तळेरे स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्मशानभूमी परिसर विविध प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध आणि सुशोभित व्हावा त्याचबरोबर झाडांची पुरेशी सावली व्हावी यासाठी तळेरे ग्रामपंचायतीने विशेष पुढाकार घेऊन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तळेरे ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण तळेरे सरपंच हनुमंत तळेकर तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, ग्रामविकास अधिकारी राजलक्ष्मी जाधव, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी अनिल पाटील व अन्य कर्मचारी, तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू जठार, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, शशांक तळेकर, प्रविण वरुणकर, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, दिनेश मुद्रस, ग्रा.प.सदस्य निलेश घाडी, अंकित घाडी, सुयोग तळेकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दशरथ कल्याणकर, पोलिस पाटील चंद्रकांत जाधव, माने आरोग्य सेविका सुचिता तळेकर, अंगणवाडी सेविका स्वाती वायंगणकर तसेच निसर्ग मित्र परिवाराचे अध्यक्ष संजय खानविलकर, सचिव राजेश जाधव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!