दोडामार्ग (प्रतिनिधी) : समाजातील तळागाळात गाव ते सामाजिक विकास प्रक्रियेत हातभार लावणाऱ्या व्यक्तीमत्व यांचा साई श्रद्धा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर – दोडामार्ग यांनी शोध घेऊन त्यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्याचे ठरविले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तीचा हा सन्मान सोहळा पुरस्कार स्वरूपात लवकरच होणार असून नावांची घोषणा अध्यक्ष -साबाजी सावंत सचिव -धारिणी देसाई, उपाद्यक्ष – मंदोदरी देसाई व संघटनेचे सर्व संचालक यांनी केली आहे. साई श्रद्धादिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर – दोडामार्ग ही संघटना तालुक्यात सामाजिक उपक्रम घेण्यात नेहमी पुढे असते अशावेळी समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीचा गौरवही संस्था करीत असते. यावर्षीचे क्षेत्रनिहाय पुरस्कार असे आहेत. तेजस तुकाराम देसाई (पत्रकार -दोडामार्ग), प्रज्ञा परब (वेगुर्ले, सामाजिक कार्यकर्त्यां), शिवानंद उर्फ शैलेश भोसले (उद्योजक गोवा – दोडामार्ग), श्रीनिवास सुरेश गवस (वकील – सावंतवाडी) नंदकुमार गजानन नाईक (मुख्याध्यापक आदर्श मुख्याध्यापक खेमराज बांदा हायस्कूल) सागर पांगुळ (कोलझर हायस्कूल शिक्षक) डॉ. उमा मिहीर प्रभुदेसाई (वैद्यकीय, कोलगाव सावंतवाडी), शरयू परब (कोलझर जि. प. शाळा शिक्षिका), श्यामराव अनंत देसाई (नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट दिग्दर्शक), प्रभाकर झिलू देसाई (कृषि बागायतदार) यांच्या नावांचा सामावेश असल्याचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी सांगितले.













