वैभववाडी (प्रतिनिधी) : १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिना निमित्त आरोग्य केंद्र वैभववाडी येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील युवा, महिला , पुरुष तसेच नवीन रक्तदान करण्यास इच्छुक रक्तदात्यांना विनम्र आवाहन आहे की जागतिक रक्तदाता दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे. तरी १४ जून २०२५ च्या रक्तदान शिबिरास या रक्तगटाच्या रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान करावे जेणेकरून रक्तदान शिबिर आणि जागतिक रक्तदाता दिवस यशस्वी होण्यास सहकार्य होईल. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत धनाजी गुळेकर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान चे तालुकाध्यक्ष श्री.राजेश पडवळ यांनी केले आहे.












