कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेत असलेला शारंगधर देशमुख यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. शारंगधर देशमुख यांच्यासोबत 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यामध्ये काँग्रेस, ताराराणी आघाडीमधील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक दोघांना देखील हा धक्का मानला जात आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 जागा महायुतीला यश मिळवता आलंय. यामुळे जिल्ह्यात महायुतीची ताकद चांगलीच वाढलीय. विशेषतः शिंदे यांच्या शिवसेनेचे ताकद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न शिवसेना करत आहे.गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे प्रमुख शिलेदार मानले जाणारे आणि माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या संदर्भात शारंगधर देशमुख यांनी शिंदे यांची भेट देखील घेतली होती. मात्र पक्षप्रवेश कधी कुठे होणार यावर प्रश्नचिन्ह होतं. अखेर आज आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शारंगधर देशमुख यांनी मुंबई येथे शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
यांनी केला पक्ष प्रवेश
शारंगधर देशमुख यांच्यासोबत काँग्रेसचे माजी महापौर निलोफर आजरेकर, प्रतिभा नाईकनवरे, माजी उपमहापौर दिंगबर फराकटे, प्रकाश नाईकनवरे, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, तात्या खेडकर, गीता गुरव, अश्विनी बारामते, सचिन मोहिते (सुनंदा मोहिते), संभाजी जाधव, संगीता संजय सावंत, पूजा नाईकनवरे, रेखा पाटील, जहांगीर पंडत, भरत लोखंडे, रशीद बारगीर, इस्माईल बागवान यांनी देखील शिवसेनेत पक्ष प्रवेश केला असून अभिजीत खतकर, किरण पाटील, इस्माईल बागवान, कुलदीप सावरतकर, अश्किन आजगेकर, अशपाक आजगेकर, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पार्थ मुंडे, उपाध्यक्ष आशुतोष मगर, दक्षिण कार्याध्यक्ष विवेक भोसले, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुजय चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या काही युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे












