खारेपाटण येथे रोटरी क्लब च्या कार्यालयाचे उद्घघाटन संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ खारेपाटण क्लब – आय डी क्रमांक २२६७३९ याची नुकतीच खारेपाटण शहरात स्थापना झाली असून या क्लब चे काम अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब ऑफ खारेपाटणच्या शाखा कार्यालयाचे उद्घघाटन नुकतेच खारेपाटण गावचे माजी सरपंच व रोट्रियन रमाकांत राऊत यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.

या उद्घघाटन प्रसंगी रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे प्रेसिडंट दयानंद कोकाटे, सेक्रेटरी – अजय गुरसाळे, ट्रेझिरियन सारिका महिंद्रे, खारेपाटण हायस्कूल मुख्याध्यापक व रोट्रियन संजय सानप, खारेपाटण हायस्कूल पर्यवेक्षक व रोट्रीयन संतोष राऊत, खारेपाटण सिनियर कॉलेज प्राचार्य व रोट्रीयन डॉ.ए डी कांबळे, रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे सदस्य संकेत शेट्ये, डॉ.उमेश बालन, सुबोध देसाई, यशवंत रायबागकर, सतीश नाईक खारेपाटण हायस्कूल शिक्षक जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

“खारेपाटण येथे रोटरीच्या नुतून कार्यालयाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली असून खारेपाटण रोटरी क्लब चे काम जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत करण्याचा आमचा मानस असल्याचे भावपूर्ण उदगार रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे प्रेसिडेंट दयानंद कोकाटे यांनी रोटरी च्या खारेपाटण कार्यलय उद्घघाटन प्रसंगी काढले.” यावेळी रोटरी क्लब चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!