कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात सगळ्यांचे वाकून बघण्याची सवय असलेल्या आणि लावालावी करण्याची खोड असलेल्या संजय ला जेव्हा भर चौकात हग्या दम मिळाला तेव्हा त्याची फे फे उडाली होती.रविवार भर दुपारी 1 वाजताची वेळ..दिव्यदृष्टीवाला संजय शहरातील चौकात उभा असतानाच लावलावी च्या कारनाम्यांनी चिडलेल्या एका लोकप्रतिनिधीने तोंडपट्टा सुरू करत संजय ला हग्या दम दिला..तप्त शब्दलाव्हा कानात शिरत असतानाच दुसऱ्याचे वाकून बघणाऱ्या त्या संजय चे चेहरा अगदी गोरामोरा झाला होता. घशाला कोरड पडत ओठही सुकले होते.अखेर तिथून काढता पाय घेत दिव्यदृष्टी चा आव आणणाऱ्या संजय ने कशीबशी आपली सुटका करून घेतली.मात्र या प्रकाराची शहरात भर दुपारपासून खुमासदार चर्चा सुरू झाली.