केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या वाढदिनी आमदार नितेश राणेंचा सामाजिक उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे उद्या 10 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 110 शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप करणार आहेत. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील शाळकरी मुलींना गरजू मुलींना याचा लाभ होणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत घोषणा करताना पहिल्या टप्प्यात 100 शाळकरी मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले होते. मात्र त्यात वाढ करून आता 110 मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील एकूण 389 गरजू शाळकरी मुलींना मोफत सायकल वाटप आमदार नितेश राणे करणार आहेत. या सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ केंद्रियउद्योगमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवशी 10 एप्रिल रोजी होणार आहे. शाळेचे अंतर घरापासून लांब असल्याने आणि वाहतुकीची गैरसोय असल्याने अनेक शाळकरी मुलींच्या शिक्षणात खंड पडतो. कित्येकदा शाळेत आणि शाळा सुटल्यावर घरी वेळेवर पोचता येत नाही. आता स्वतःच्या हातात सायकल असल्यामुळे या शाळकरी मुलीं ची वाहतुकीची गैरसोय दूर होणार असून त्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी याचा फायदा होणार आहे. मोफत सायकल चा लाभ मिळणाऱ्या शाळकरी मुली आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आमदार नितेश राणेंच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.