कासार्डे ज्यु.कॉलेजमध्ये ‘आर्थिक साक्षरता जनजागृती’ कार्यक्रम…

सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर यांचे मार्गदर्शन 

तळेरे (प्रतिनिधी) : आर्थिक साक्षरता केंद्र मालवण क्षेत्र कणकवली तालुका शाखेच्या वतीने कासार्डे विद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर,कणकवली तालुका प्रतिनिधी सुभाष राणे,मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री बिसुरे,विद्यालयाचे शिक्षक प्रा.विनायक पाताडे उपस्थित होते.

आर. बी . आय,नाबार्ड,स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांच्या अर्थसाहाय्यतून ग्रामीण भागातील महिला कामगार, पुरुष व युवक,युवती यांना आर्थिक जनजागृती बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर यांनी बँक ठेव योजना,मासिक प्राप्ती योजना,भविष्य निर्वाह निधी, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना,सुकन्या समृद्धी योजना,जेष्ठ नागरिक बचत योजना,अटल पेन्शन योजना,,ग्राहक शिक्षण व सरंक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. विनायक पाताडे यांनी मांडले

error: Content is protected !!