वाघेरी येथे कृषीकन्यांकडून स्व.वसंतराव नाईक जयंती व कृषी दिवस साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी विभागाच्या अंतिम वर्षाच्या कृषीकन्यांकडून ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव व कार्यक्रम अंतर्गत वाघेरीमध्ये कृषी दिवस आणि स्व.वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त वृक्षदिंडी, वृक्षारोपण व कृषीकन्यांमार्फत महाविस्तार अँप विषयी माहिती यांसारखे उपक्रम राबविण्यात आले. प्राथमिक प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसोबत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. उपस्थित विद्यार्थी व शिक्षक वर्ग यांच्यासोबत वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी श्री. गुरव होते तसेच या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व प्रगतशील शेतकरी यांचे सत्कार करण्यात आले. शाळेचे मुखाध्यापिका तांबे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कृषी कन्या कल्याणी पाटील, प्रांजल भोसले, समृद्धी कुराडे, निकिता कावणेकर, प्रिया नागरगोजे, साईश्वरी निकम, नम्रता महामुनी, प्रज्ञा देशमुख, प्रगती जाधव, लावण्या झोरे, ज्योतिका कंदले या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. प्राथमिक शाळेत आयुर्वेदिक तसेच फुलझाडे कृषिकन्यांकडून भेट देण्यात आले तसेच कृषीकन्यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून सादर केली.

विद्यार्थीना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते सर व कार्यक्रमाचे समन्वयक बगाडे सर, मोटे सर तसेच चव्हाण सर यांचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!