वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कुमार निहाल प्रसाद राणे याने वे टू इस्त्रो या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा इंटरनॅशनल स्कूल ऑफ प्रोफेशन स्टडीज या संस्थेमार्फत घेण्यात आली होती. निहालने साखरेचा इंधन म्हणून वापर केलेल्या रॉकेट मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला आहे. निहाल सध्या आचिर्णे जुनियर कॉलेज येथे इयत्ता बारावी इयत्तेत शिकत आहे. नवनवीन प्रयोग करण्याचा व विज्ञान मॉडेल करण्याचा त्याला छंद आहे.यापूर्वीही त्याने तयार केलेल्या प्रतिकृतीला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आला होता.तसेच इ्स्पायर अवॉर्ड सारख्या स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. वे टू इस्त्रो ही महाराष्ट्र राज्यात पाच विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक विभागातून 10 विद्यार्थी असे एकूण 50 विदयार्थी ही संस्था महाराष्ट्रातुन इस्रोला घेऊन जाणार आहे. या स्पर्धेमुळे त्याला भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. त्याला त्याचे वडील प्रसाद राणे यांचे तसेच जुनियर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. फोंडके व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.












