कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक श्री अतुल जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांच्या वतीने सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली युवक अध्यक्ष नयन गावडे, राष्ट्रवादी वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष अक्षय मराठे, विभाग अध्यक्ष विनायक गावडे, वाहतूक सेल तालुकाध्यक्ष रवींद्र गावडे आदी उपस्थित होते.
पीआय अतुल जाधव यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत











