श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब व पळसंब शाळा न. १ यांचे आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब व पळसंब शाळा न. १ यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात रुद्र मोबारकर तर छोट्या गटात स्वरित कोल्हे याने प्रथम क्रमांक पटकवला. जिल्ह्यातील 80 स्पर्धेकांनी सहभाग दर्शवीला. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे.
मोठा गट
प्रथम – रुद्र मोबारकर (एम आर देसाई हायस्कूल वेंगुर्ला ), ( मनोज हडकर उदयोजक पुरस्कृत),
द्वितीय – तनिष्का आडेलकर (विद्यामंदिर हायस्कुल कणकवली ), (विधाता सावंत वेगुर्ले नगरसेवक पुरस्कृत),
तृतीय – चैतन्य फातर्पेकर (भेडशी हायस्कुल – दोडामार्ग ), (प्रमोद सावंत पुरस्कृत ).
लहान गट
प्रथम – स्वरित कोल्हे (रोझरी इंग्लिश मिडियम मालवण) (अवधूत हळदणकर आचरा सोसायटी चेअरमन पुरस्कृत),
द्वितीय – प्रतिक देसाई (मिलाग्रिस सावंतवाडी), (विनोद कदम मुख्याध्यापक पळसंब पुरस्कृत),
तृतीय -कु. रुद्र ठाकुर (विद्या निकेतन कसाल) (अपूर्वा पवार मॅडम पळसंब शाळा पुरस्कृत ).
कोकण मराठी साहित्य परिषद मालवण चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी दिप प्रज्वलन करून उदघाट्न केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन अपूर्वा पवार व सोनगटटे मॅडम व प्रास्ताविक प्रमोद सावंत केले. यावेळी सेवानीवृत उपमुख्य कार्यकारी राजेद्र पराडकर, मुख्याध्यापक विनोद कदम, मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, शालेय अध्यक्ष रविकांत सावंत, मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, उपाध्यक्ष अमरेश पुजारे, सचिव चंद्रकांत गोलतकर, अमित पुजारे, अक्षय परब, वैभव परब, हितेश सावंत, शेखर पुजारे, रामचंद्र पुजारे व नॅशनल पंच श्रीकृष्ण आडेलकर, बुद्धिबळ पटटू निलेश सरजोशी, रुद्र सरजोशी, राजेश मुणगेकर, निनाद पेडणेकर, शिक्षिका सोनगडे, अशोक जुवेकर, अनुज गोलतकर, वेदांत सावंत, दाजी जुवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या आवारात सुपारीच्या झाडाचे वृक्षारोपण निलेश सरजोशी व राजेद्र पराडकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, कोणाला देव शोधायचा असेल तर नक्कीच पळसंब मध्ये या देव भेटेल असे भावनीक विचार मांडले. पळसंब शाळेत फक्त 17 मुले आहेत परंतू त्या मुलांमध्ये 70 स्पर्धक आणण्याची ताकद दिसली. थेट जिल्हास्तरीय स्पर्धेच नियोजन व दोहमार्ग, सावंतवाडी, वेगुर्ला कुडाळ मालवण देवगड वैभववाडी कणकवली या तालुक्यातून आलेले स्पर्धक पाहता व चोख नियोजन पाहून मंडळाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मालवण तालुक्यात सर्वोत्कृष्ट मंडळ असल्याचे कौतुक केले. माजी जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र पराडकर म्हणाले, मंडळाला मी जवळून पाहिले आहे. मंडळाच्या कार्यकत्याची ताकद खुप मोठी आहे. बुद्धिबळ सारखी स्पर्धा आजोजित करणे व जिल्ह्यातील 80 सर्धकांना आमत्रींत करणे व स्पर्धा यशस्वी करणे हे फक्त पळसंबच्या जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळालाच जमू शकते. कधी हाक मारा सदैव तुमच्या सोबत आहे. नॅशनल पंच बुधिबळ श्रीकृष्ण आडेलकर यांनी पळसंब शाळेतील व गावातील मुलांना आपण बुद्धीबळ खेळाचे मंडळाच्या वतीने विनामुल्ये मार्गदर्शन देवू त्यासाठी मला केव्हा ही हाक मारा मी आज पासून मंडळाचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत आहे असे सांगितले. पळसंब माजी सरपंच मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर यानी जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करणे व यशस्वी करणे हे काही सोपे काम नाही . मंडळाच्या हाकेला सपूर्ण जिल्हातून 80 स्पर्धक पळसंब च्या आई जयंतीदेवीच्या पुण्य भूमीत पावसाच्या दिवसात पण आले त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मानतो. बुध्दिमान मुले पळसंब शाळेत स्पर्धेच्या निमित्त आली त्याचा फायदा माझ्या शाळेतील मुलांना नक्किच झाल्या शिवाय राहणार नाही. पळसंब गाव नेहमीच मंडळाच्या मागे प्रत्येक उपक्रमात सहभागी राहिला. भविष्यातही अनेक उपक्रम गावाच्या हिताचे मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येतील व आजीव सभासदांची संख्याही मोठी वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पळसंब गाव जिल्हात अग्रेसर राहिल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या स्पर्धेसाठी रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र अशा स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तसेच सर्व सन्मान चिन्ह मंडळाचे आजीव सभासद व साहित्यिक गिरिधर पुजारे पुरस्कृत सर्व मेडल मंडळाचे आजीव सभासद दिगंबर साटम पुरस्कृत सर्व प्रमाणपत्र आचरा पोलीस स्टेशन यांच्या कडून देण्यात आली. या स्पर्धेला पळसंब गावचे सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, ग्रामसेवक अमित कांबळी, पो. पाटील पूनम गोलतकर यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.











