कलमठ कुंभारवाडी शाळेच्या विद्यार्थ्यानी घेतला ईव्हीएम निवडणूकीचा अनुभव

प्रचार, बूथ, मतदान आणि मतमोजणीची प्रात्यक्षिकातून घेतली माहिती

कणकवली (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना निवडणुकी संदर्भातील सर्व माहिती प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मिळावी या हेतूने कलमठ कुंभारवाडी शाळेमध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक ईव्हीएम पद्धतीने घेण्यात आली. अगदी निवडणूक प्रचार, बूथ पासून ते मतदान अधिकारी ईव्हीएम माध्यमातून मतदान आणि मतमोजणी पर्यंतची सर्व प्रक्रिया विद्यार्थ्यांना यानिमित्ताने समजावून सांगण्यात आली.

प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश डोईफोडे, उपशिक्षक अमित हर्णे, ऋतुजा जाधव, चित्राक्षी देसाई यांच्या माध्यमातून अगदी निवडणुकीच्या प्रचारापासून ते मतपत्रिका छापणे ईव्हीएम मशीनद्वारे माहिती देणे संपूर्ण मतदान प्रक्रिया मतमोजणी विजयी जल्लोष मिरवणूक व त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापना व शपथविधी आधीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात आली.

प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्यांना प्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले अखेर मुख्यमंत्री म्हणून नमिष चिंदरकर, उपमुख्यमंत्री शनया धारवाडकर, शिक्षण मंत्री समर्थ कुंभार, आरोग्य मंत्री दक्ष नादीवडेकर, क्रीडामंत्री ओम गोठणकर, सांस्कृतिक मंत्री आसावरी राठोड, स्वच्छता मंत्री वेदिका लोकरे, परिपाठ मंत्री वैभवी घाडीगावकर, फलक लेखन अलिशा गुंडकनाल, सहल मंत्री सिद्धार्थ भिसे यांची निवड करण्यात आली.

error: Content is protected !!