अखेर जानवली दत्तमंदिरातील चोरीची मूर्ती सापडली

नाट्यमय रित्या चोरलेली दत्तमूर्ती दत्तमंदिराजवळ ठेवली आणून

चोरटे कोण ? प्रश्न अद्याप अनुत्तरित

कणकवली (प्रतिनिधी) : जानवली कृष्णनगरी येथील दत्तमंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती 10 जुलै रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या दत्तमंदिरानजीकच सापडून आली. बातमी समजताच एलसीबी चे पथक तातडीने घटनास्थळी पोचले असून पंचनामा सुरू आहे. कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनीही घटनास्थळी जात पाहणी केली. श्वान पथक सुद्धा मूर्ती सापडलेल्या ठिकाणी दाखल झाले आहे.विशेष म्हणजे 5 जुलै रोजी मध्यरात्री चोरट्यानी चोरलेली मूर्ती पाच दिवसांनी चोरीच्या घटनास्थळानजीकच सापडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांनी सदर दत्त मूर्ती पुन्हा चोरीच्या ठिकाणी आणून सोडण्याचे कारण ? ते चोरटे कोण ? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

error: Content is protected !!