जिल्हा परिषद शाळा कासरल सातरल येथे पाद्यपूजनाने गुरुपौर्णिमा साजरी

कणकवली (प्रतिनिधी) : आज गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सातरल कासरल येथे माजी विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत गुरूंच्या पाद्यपूजनाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुंप्रती असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांनी गुरूंचे पाद्यपूजन करत त्यांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर व इतर शिक्षकवृंद, सातरल उपसरपंच संकेत राणे, ग्रा. सदस्य सदाशिव राणे, ग्रामपंचायत सदस्या दर्शना सावंत, विनोद परब, सुशिल राणे, दत्ताराम आमडोस्कर, समीर राणे, दशरथ सावंत, सुहास बागवे, मीरा राणे इत्यादी पालक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!