कणकवली (प्रतिनिधी) : उपजिल्हा रुग्णालय कणकवली हे जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेने करोडो रुपये खर्च करुन रुग्णांच्या उपचारासाठी उभारलेले रुग्णालय असून महिन्याकाठी लाखो रुपये या रुग्णालयासाठी शासनाचे खर्च केले जात आहेत. परंतु हा खर्च रुग्णांसाठी कमी व कर्मचाऱ्यांसाठीच होतो की काय असा प्रश्न रुग्णांना पडलेला आहे.या रुग्णालयात फॅक्चर रुग्णांना १५ ते २० दिवस शस्त्रक्रीयेसाठी तंगवून ठेवले जात आहे. त्यामुळे हाड मोडलेल्या रुग्णांना इन्फ्केशन होऊन जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी अत्यावश्यक यंत्र सामग्री नसल्याने नाहक भुर्दंड रुग्णांना पडत आहे.या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची पदे भरलेली असूनही बहुतेक डॉक्टर सेवेत हजर नसतात.सिटी स्कॅन सेवा उपलब्धतेचे फलक लावण्यात आलेले असून सिटी स्कॅन मशिन धूळ खात पडलेली आहे. त्यामुळे रुग्णांना एकतर ओरोस किंवा खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. तसेच सोनोग्राफीसाठी रेडीओलॉजिस्ट नाही.
या रुग्णालयात रक्तपेढी होणे आवश्यक असून येथे रक्तपेढी नसल्याने रक्त आणण्यासाठी ओरोसला जावे लागत आहे.
वैद्यकीय महाविद्यालय असताना रुग्णांना बांबुळी गोवा येथे पाठविले जात आहे. फॅक्चर वॉर्ड, जनरल वॉर्ड, महिला वॉर्ड हे दुसऱ्या मजल्यावर आहेत. लिफ्ट बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.
या रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ नाही. अशा एक ना अनेक समस्या असून या समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहेत.
मागण्या खालीलप्रमाणे
१. हाडांच्या रुग्णांची हेळसांड धांबवून अद्ययावत यंत्र मामुग्री डॉक्टर तात्काळ उपलब्ध करावेत. व २४ तास तज
२. रुग्णालयात पद भरती झालेले, डॉक्टर रजेवर असतात ते सर्व डॉक्टर मेवेत उपलब्ध असावेत.
३. सिटी स्कॅन चे (फलक लावलेली) मशिन तातडीने रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करुन द्यावी.
४. सोनोग्राफीसाठी रेडिओलॉजिस्ट तात्काळ उपलब्ध करुन द्यावा.
५. या रुग्णालयात मिनी रक्तपेढी उपलब्ध व्हावी.
६. बंद लिफ्ट तात्काळ दुरुस्त करावी.
७. गोवा बांबुळी रुग्णालयासारखी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथे सुदृढ करावी.
८. रुग्णालयात सीसीटीव्ही तात्काळ बसविण्यात यावेत.
या सर्व समस्या १४ ऑगस्ट पर्यंत न सोडविल्यास १५ ऑगस्ट रोजी शासकीय वेळेत उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सत्यशोधक सेक्युलर फ्रंट चे अध्यक्ष अॅड सुदिप कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.











