केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरगावणे – बेर्ले शाळांमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री कोकणचे सुपुत्र नामदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त कुरगावणे – बेर्ले ग्रामपंचायत सरपंच व कट्टर राणे समर्थक पप्पू ब्रम्हदंडे यांच्या वतीने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याना नुकताच खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी उपसरपंच बबलू पवार,भाजप पक्षाचे तालुका कार्यकारणी सदस्य रवींद्र लाड,ग्रामपंचायत सदस्य बाबला गोसावी,स्नेहा गोसावी,भाजपचे बूथ अध्यक्ष सदाशिव कुडाळकर, दिनेश पांचाळ,बाबू गोठाणकर,राजेंद्र लाड,जितेंद्र पवार,संतोष पांचाळ, चंद्रकांत जाधव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कुरगवणे – बेर्ले ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सरपंच पप्पू ब्रम्हदंडे यांच्या शुभहस्ते खाऊ वाटप करण्यात आला. या उपक्रमाबद्दल शाळेची शिक्षक व ग्रामस्थ यांनी सरपंच महोदय आणि ग्रामपंचायतीचे आभर व्यक्त केले.

error: Content is protected !!