मध्यप्रदेशच्या कमलेश दहिया या निराधार मनोरूग्ण युवकाला लाभला जीवन आनंद संस्थेच्या आश्रमचा आधार

सांताक्रुजच्या वाकोला पुलाखाली कमलेश जगत होता निराधार जीवन

खारेपाटण(प्रतिनिधी) :जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव असलेले संदिप परब आणि त्यांच्या जीवन आनंद संस्थेची टिम समाजातील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. संदिप परब यांना ११ जून,२०२२ रोजी सांताक्रुजच्या वाकोला उड्डाण पुलाखाली जून-२०२२ मधे एक निराशाग्रस्त आणि शारिरीक व मानसिक आजाराने खंगलेला कमलेश दहिया हा युवक आढळून आला. कमलेश ला त्यांनी वाकोला पोलिस स्टेशनचे माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या मुंबई महापालिकेच्या दीन दयाळ उपाध्याय बेघर निवारा योजनेअंतर्गत चालविण्यात येत असलेल्या कार्व्हर डे नाईट शेल्टर होममधे दाखल करून वर्षभराच्या ताटातुटी नंतर माय लेकरांची भेट घडवून आणली.

शेल्टर होम मधे कमलेशला थोडे बरे वाटू लागल्यानंतर त्याच्याशी हळूहळू संवाद सुरू झाला. केवळ इ.२ री पर्यंत शालेय शिक्षणाची संधी मिळालेला कमलेश स्वभावाने मितभाषी होता.कमलेशकडे त्यावेळी कुटुंबियांना संपर्क करण्यासाठी एखाद्याचा संपर्क फोन नंबरही उपलब्ध नव्हता. संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी कमलेशशी बोलून मिळालेल्या त्याचे गाव बेरेथिया उबरी,ता.ऊंचेहरा व जिल्हा सतना या माहितीवरून गुगल सर्चच्या द्वारे त्या भागातील खासदार गणेशसिंग यांचा नंबर मिळवून कमलेशच्या कुटुंबियांशी त्याचे पुनर्मिलन करण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. त्यांनी तात्काळ सबंधीत विभागाचे एसडिएम यांचा संपर्क नंबर देवून त्यांना सहाय्य करण्यास सुचना केली….एसडिएम यांनी तात्काळ चांगले सहकार्य केले.काही दिवसांतच कुटुंबियांचा संपर्क नंबर मिळाल्यावर कमलेशचा घरच्यांशी आणि आईशी व्हिडिओ काँलद्वारे संवाद करून देण्यात आला. मात्र घरच्या दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबातून दुरावलेल्या मुलाचा तपास लागूनही तात्काळ त्यास घेण्यासाठी घरच्यांना मुंबईला येणे शक्य झाले नाही..अखेर आज कमलेशचा ठावठिकाणा लागल्यानंतर दहा महिन्यांनी कमलेशची अशिक्षित आई गुजराथीया दहिया एका नातलगासह मध्यप्रदेशातून मुंबईत दाखल झाली. संस्थेच्या कार्यकर्त्यांसह आईने वाकोला पोलिस स्टेशनला स्वतःची ओळख पटविल्यावर त्यांना समर्थ आश्रमातून कमलेशच्या रिलीजसाठी लेटर मिळाले.

मधल्या काळात शेल्टर होममधे प्रकृतीने खंगलेल्या कमलेशची आरोग्य तपासणी केली असता त्याला टि.बी.चे निदान झाले. वसई विरार महापालिकेच्या दवाखान्यात टिबी वरील औषधांचा कोर्स पुर्ण करण्यात आला. कमलेशच्या आजारा दरम्यान कार्व्हर डे नाईट शेल्टर सांताक्रुज च्या व विरारफाटा येथील समर्थ आश्रमातील कार्यकर्ते संपदा सुर्वे,भाईदास माळी, कविता कदम,वैशाली काकड, उज्वला जाधव, दिपाली मेघा-माळी, चंदा छेत्री या कार्यकर्त्यांनी त्याची कुटुंब सदस्याप्रमाणे शुश्रुषा करून काळजी घेतली.क्लीनिकल सायकोलाँजिस्ट आदिती ग्वुईन यांनी कमलेशचे वेळोवेळी कौन्सेलिंग केले. याबद्दल संदिप परब यांनी समस्त कार्यकर्त्यांचे तोडभरून कौतुक केले.आता त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.

नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात कमलेशला औक्षण करून पुढिल आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छा देवून मध्यप्रदेशातील गावी परतण्यासाठी त्यास निरोप देण्यात आला. कमलेश दहिया च्या निरोपाच्या पार्श्वभुमिवर बोलताना संदिप परब यांनी, “आज वेगाने बदलत असलेल्या समाज जीवनात, मुंबईसारख्या शहरात माणसांची अवती भवती सतत धावपळ सुरू आहे. माणसांच्या गर्दीत इथे शेजारच्या माणसाशीही बोलायला कुणाला वेळ मिळत नाही. आणि म्हणून आज रस्त्यावरच्या बेघर, निराधार, मानसिकरुग्ण, आजारी, वेदनांनी विव्हळणा-या माणसांना माणूसकीचं जीवन मिळवून देणा-या शेल्टरहोम आणि आश्रमांची ठिकठिकाणी अत्यंतिक आवश्यकता आहे. आणि आश्रम आणि शेल्टर होमसाठी मूलभुत गोष्टींकरिता शासनाचे सहाय्य आणि समाजाचे पाठबळ आवश्यक असल्याचे,” संदिप परब यांनी म्हटले. कमलेश दहिया या युवकाच्या कुटुंब पुनर्मिलन प्रक्रीयेत वाकोला पोलिस स्टेशनचे पिएसआय रितेश माळी व एपीआय सुदर्शन सुर्वे यांचे महत्वाचे सहाय्य झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!