रक्तदान म्हणजेच जीवनदान संदेश देत मुख्यमंत्रांचा वाढदिवस साजरा
कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवंद्र फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान म्हणजेच जीवनदान असा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपत भाजपा कणकवली शहर मंडल च्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कलमठ ग्रामपंचायत च्या श्रीदेव कलेश्वर सभागृहात आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजपा कणकवली तालुका शहर मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा बँक संचालक ऍड. समीर सावंत,विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी भाजप कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी,माजी नगराध्यक्ष मेघा गांगण,महेश लाड,कळसुली सरपंच सचिन पारधीये,वागदे सरपंच संदीप सावंत, बेळणे सरपंच अविनाश गिरकर,समीर प्रभुगावकर,कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे , चारुदत्त साटम,साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम,विजय चिंदरकर,सागर पवार,संतोष चव्हाण,बाबजी,आनंद साटम,सोमनाथ चव्हाण, आनंद साटम, तेजस लोकरे,नितीन पवार,प्रशांत राणे,अमजद शेख,अनुप वारंग,बाबू घाडीगांवकर,भाई काणेकर, प्रीती मेस्त्री,सुप्रिया मेस्त्री, नजराणा शेख,मिलिंद चिंदरकर,परेश कांबळी,संदीप नलावडे, श्रेयस चिंदरकर,बाबू नारकर,पपु यादव,स्वाती नारकर, सुभाष मालंडकर आदी उपस्थित होते.










