मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तसेच आजोबा व वडिलांच्या आठवणींचे औचित्य
कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तसेच आपले आजोबा ओसरगाव माजी उपसरपंच कै. हरिश्चंद्र गंगाराम राणे आणि वडील कै. शिवराम केशव राणे यांच्या स्मरणार्थ ओसरगाव पटेलवाडी येथील प्रदीप राणे व गौरव राणे यांच्या माध्यमातून जि. प. प्रा. शाळा ओसरगाव नं. १ येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर कदम, प्रदीप राणे, गौरव राणे, बबली राणे तसेच शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक किशोर कदम यांनी प्रदीप राणे व गौरव राणे यांचे खाऊ वाटप केल्याबद्दल आभार मानले.



















