खारेपाटण हायस्कूलच्या सन १९८८ – ८९ एस एस सी बॅच कडून

शाळेला दोन स्टील कोच व एक स्टील टी पॉय भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व जुनियर कॉलेज खारेपाटण मधील सन १९८८-८९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी (एस एस सी) बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला पालक वअभ्यागतांसाठी च्या बैठकव्यवस्थेसाठी दोन स्टील कोच (तीन आसनी) व एक स्टील टी पॉय नुकताच भेट देण्यात आला. खारेपाटण हायस्कूलचे माजी विद्यार्थी अमोल ताळगावकर यांनी नुकतीच शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी सन १९८८-८९ च्या दहावी बॅच च्या माजी विद्यार्थ्यानाच्या वतीने शाळेला बैठक व्यवस्थेसाठी दोन स्टील कोच व एक टी पॉय शाळेचे मुख्याद्यापक संजय सानप यांचेकडे सुपूर्द केले. यापूर्वी देखील शाळेचे माजी विद्यार्थी अमोल तळगावकर यांच्या आर्थिक सहकार्यातून संपूर्ण प्रशालेमधील व्हरांडा सुशोभित करून देण्यात आला आहे.

तर माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या मदत आणि सहकार्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुळकर सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!