प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत कळसुली येथील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्यामार्फत कळसुली येथील जिल्हा परिषद शाळांतील तसेच अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्याचा संस्थेचा मानस असून संस्थेने कोरोना कालावधीतही लोकोपयोगी कामे करून जनमानसात आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर, सदस्य सिद्धेश परब, संस्थेचे तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, मिथुन लाड, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच विद्यार्थी आणि पालकवर्ग उपस्थित होता.

error: Content is protected !!