प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत शिरवल येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : प्राणजीवन सहयोग संस्था शिरवल यांच्या मार्फत कै. राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रघुनाथ चौकेकर यांच्या सौजन्याने कणकवली मधील शिरवल शाळा येथे विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. प्राणजीवन सहयोग संस्थेमार्फत जिल्ह्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेने कोरोना कालावधीतही अनेक लोकोपयोगी कामे करून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. रेनकोटचे वाटप करून संस्थेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य केले असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

या रेनकोट वाटप कार्यक्रमावेळी संस्थेचे तालुका प्रतिनिधी प्रशांत गावडे, सदस्य अनिप सावंत, अरुण चौकेकर, चंद्रशेखर सावंत, मनोज राणे, पत्रकार तुळशीदास कुडतडकर, शिरवल उपसरपंच, शिरवल पोलीस पाटील तसेच पालक, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!