वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उंबर्डेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे नेतृत्वाखाली वैभववाडीत विविध कार्यक्रम पार पडले. उंबर्डे माध्यमिक विद्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. तसेच मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊवाटप करण्यात आले. प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे, उपाध्यक्ष रमेश मोपेरकर,ओबीसी तालुका अध्यक्ष शशी मुद्रस, भागीरथ प्रतिष्ठानच्या दिपाली खैरतोडे, मुख्याध्यापक राठोड, जिल्हा शिक्षण विभागाचे सुजित चितळे, पाटील, युवक तालुका सरचिटणीस शैलेश साळवी, मोहन लसणे, वैभव सुतार उपस्थित होते.











