प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीचा संदेश – शाळा आणि गाव बनतील व्यसनमुक्त

कणकवली (प्रतिनिधी) : जि. प. माध्यमिक शिक्षण विभाग सिंधुदुर्ग, समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग नशामुक्त भारत अभियान सिंधुदुर्ग नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई आणि व्यसनमुक्ती सल्ला केंद्र वागदे ,कणकवली यांच्या संयुक्तप विद्यमाने नशा मुक्त भारत अभियानांतर्गत नशा मुक्त सिंधुदुर्ग स्थापित प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांना नशा मुक्त कृती आराखडा कार्यक्रमाचे प्रशिक्षण कणकवली कॉलेज येथील एचपीसीएल हॉल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख गटशिक्षणाधिकारी श्री. गवस, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. आर. आर. अमृते, प्रा. विजय सावंत, प्रा. एम. जे. कांबळे, प्रा. विनिता सावंत शिक्षण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर उपस्थित होते.

विद्यार्थी प्रहरी क्लब प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

गटशिक्षणाधिकारी श्री. गवस यांनी कलम 47 चे वाचन करुन केले. यावेळी प्रा. हरिभाऊ भिसे यांनी तरुणांमध्ये वाढत्या व्यसनांना आळा घालण्यासाठी प्रहरी क्लबच्या प्रशिक्षणाचा चांगला उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी प्रहरी क्लबच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाचा उपयोग आपली शाळा व आपला गाव नशा मुक्त करता येणार असून जून ते फेब्रुवारी या आठ ते नऊ महिन्याच्या कालावधी विविध जनजागृतीचे उपक्रम राबवून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील जनतेला व्यसनांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न या प्रहरी क्लबच्या माध्यमातून होणार असून. या प्रशिक्षणासाठी देवगड वैभववाडी कणकवली या तीन तालुक्यातील हायस्कूलचे शिक्षक आणि प्रहरी क्लबचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय सावंत यांनी केले. शेवटी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!