मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आणि माजी आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे भव्य मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राणे हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कुडाळ यांच्या सौजन्याने, डॉ. जी. टी. राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबिर आज यशस्वीरित्या पार पडले.हृदयरोग तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
शिबिराचे उद्घाटन डॉ. जी टी राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. राणे हॉस्पिटल रिसर्च सेंटर, कुडाळ येथील ख्यातनाम हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जी. टी. राणे यांचे स्वागत मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख उमेश मांजरेकर, शाखाप्रमुख (मेढा) बंड्या सरमळकर, हेमंत मोंडकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, महिला तालुका संघटक दीपा शिंदे, महिला शहर संघटक रश्मी परुळेकर, नीना मुंमबरकर, विद्या फर्नांडिस, माधुरी प्रभू, मंदा जोशी, मोहन मराळ, महेश देसाई, प्रसाद चव्हाण, अन्वय प्रभू, राका रोगे, चिंतामणी मयेकर, युवतीसेना भाग्यश्री लाकडे खान, राहुल जाधव, रमेश कद्रेकर, प्रवीण लुडबे, वायरी सरपंच भगवान लुडबे, अक्षय भोसले, रुपेश प्रभू, युवासेना मसुरे विभागप्रमुख राहुल सावंत, सिद्धेश मांजरेकर, किशोर गावकर, शशिकांत शिंदे, प्रत्युष भोगले, महेश जावकर यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरात अनेक नागरिकांनी आपल्या हृदयाची तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिरात डॉ. प्रियश्री कदम, अंजली शेणई, रोशन मुंबरकर, संतोष गुंजाळ या वैद्यकीय पथकाने तपासणीसाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचे हे सहकार्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे आरोग्य शिबिर, समाजाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीचे आणि लोकसेवेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरले. नागरिकांना मोफत हृदयरोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने, आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या अनेकांना याचा लाभ झाला. भविष्यातही अशाच प्रकारच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे. या शिबिरामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याची संधी मिळाली आणि अनेक गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार घेण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.














