अद्वैत दिवाळी अंक आयोजित कथा-काव्य स्पर्धेसाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूजच्या वतीने अद्वैत दिवाळी अंक कथा-काव्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कथा आणि काव्य स्पर्धा राज्यस्तरीय आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. प्राप्त कथा आणि कवितांमधून एका कथेला राज्यस्तरीय अद्वैत उत्कृष्ट कथा आणि अद्वैत उत्कृष्ट कविता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट कथेला रोख रक्कम 2 हजार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि राज्यस्तरीय उत्कृष्ट कवितेला रोख रक्कम 1 हजार 500, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा मर्यादित कथा आणि काव्य स्पर्धेत प्रत्येकी पहिल्या तीन कथा आणि कवितांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिल्या तीन कथांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये 1 हजार, 750 आणि 500 स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच पहिल्या तीन कवितांना अनुक्रमे रोख रक्कम रुपये आठशे, सहाशे आणि चारशे स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सरिता पवार मोबा. 9403296694, राजन चव्हाण मोबा. 7038834356 यांच्याशी संपर्क साधावा.

error: Content is protected !!