नाथ पै नगरसाठी पिडब्ल्यूडी च्या जागेत अद्ययावत उद्यान उभारावे

प्रस्तावित गार्डनचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्यान नामकरण करावे

अमोल रासम यांची पालकमंत्री नितेश राणेंकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै नगर हा भाग कणकवली उपजिल्हा रुग्णालयालगत आणि रेल्वे स्टेशन रोड दरम्यान शहराच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असून नाथ पै नगरसाठी अद्ययावत उद्यान पिडब्ल्यूडी च्या मालकीच्या जागेत उभारावे. नाथ पै नगरमधील प्रस्तावित या गार्डनचे लोकनेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्यान असे नामकरण करावे अशी आग्रही मागणी नाथ पै नगर मधील रहिवासी अमोल रासम यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नयन दळवी उपस्थित होते. निवेदनात अमोल रासम यांनी म्हटले आहे की, नाथ पै नगरमधील स्थानिक नागरिकांच्या आरोग्यासाठी, जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी अद्ययावत गार्डन उभारण्यात यावे. यासाठी पिडब्ल्यूडी च्या मालकीच्या विस्तीर्ण जागेचा वापर करता येईल. पिडब्ल्यूडी च्या मालकीची जागा प्रस्तावित गार्डनसाठी हस्तांतरित करण्यात यावी. या गार्डनचे माजी मुख्यमंत्री आदरणीय नारायण राणे उद्यान असे नामकरण करण्यात यावे. या गार्डनसाठी डीपीडिसी अथवा अन्य शासकीय योजनेतून निधी मंजूर करावा अशी मागणीही अमोल रासम यांनी केली आहे.

error: Content is protected !!