दादर ते कुडाळ मोफत ट्रेन २५ ऑगस्टला धावणार
कुडाळ (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिंधुदुर्गवासीय भक्तांसाठी आनंदाची बातमी आली असून आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने दादर ते कुडाळ अशी “शिवसेना एक्स्प्रेस” ही विशेष मोफत ट्रेन २५ ऑगस्ट रोजी धावणार आहे. ही ट्रेन सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून निघेल आणि इतर कोणत्याही स्थानकावर न थांबता थेट कुडाळ येथे पोहोचेल. यासाठी प्रवाशांना कोणतेही भाडे आकारले जाणार नसून विनामूल्य तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तिकीट बुकिंगसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
8652489964
8652272031
वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत
बुकिंगसाठी आधारकार्ड किंवा मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. हा अपूर्णपणे मोफत असल्याने प्रवाशांनी कोणालाही बुकिंगसाठी पैसे देऊ नयेत, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले आहे. गणेशभक्तांसाठी हा एक सोयीचा आणि स्वागतार्ह उपक्रम ठरत आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गावात सुखरूप पोहोचण्यासाठी ही एक सुंदर संधी ठरणार आहे.












