खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचा सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने गौरव

१०० टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थामध्ये खारेपाटण सोसायटीचा समावेश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण दशक्रोषातील शेतकरी बांधवांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरलेली खारेपाटण येथील खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेचा नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १०० टक्के कर्ज वसुली केल्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या शुभहस्ते विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, गजानन गावडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, खरेदी विकी संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्र देसाई, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,अंतर्गत लेखा परीक्षक के. डी वरक, तालुका विकास अधिकारी दिगंबर गवाणकर,कणकवली शाखा व्यवस्थापक राजू घाडीगावकर,संस्था संगणीकरण व्हि. डि हडकर तसेच बँक अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात १०० टक्के कर्ज वसुली केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १९ सहकारी संस्थाचा जिल्हा बँकेच्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या संस्थाचा देखील समावेश होता. खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा गौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्थेचे व्हॉईस चेअरमन एकनाथ कोकाटे, संचालक इस्माईल मुकादम, सुरेंद्र कोरगावकर, विजय देसाई, मोहन पगारे, श्रीधर गुरव, उज्ज्वला चिके संस्थेचे सचिव अतुल कर्ले व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या शुभहस्ते खारेपाटण गट विकास सेवा सोसायटीचा १०० टक्के कर्ज वसुलीबाबत शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन विषे गौरव करण्यात आला. खारेपाटण सोसायटीला मिळालेल्या या सन्मानाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. तर खारेपाटण सोसायटीचे चेअरमन रवींद्र जठार यांनी संस्थेच्या सर्व सभासद,संचालक व कर्मचारी वर्गाचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!