कणकवली व्यापारी संघाचा सामाजिक उपक्रम; ७ ऑगस्टला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते वैद्यकीय तपासणी शिबिराचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कै. महेश नार्वेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कणकवली व्यापारी संघातर्फे वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भालचंद्र महाराज संस्थान कणकवली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तृप्ती धोंडमिसे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, सुरेश कामत अध्यक्ष भालचंद्र महाराज संस्थान, प्रसाद पारकर माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, संजय सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, पंकज पाटील वैद्यकीय अधीक्षक उप जिल्हा रूग्णालय कणकवली.

या शिबिराचे उ‌द्घाटन शुक्रवारी दिनांक 07 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हाधिकारी सौ तृप्ती धोंडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या शिबिरात आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड काढून मिळणार आहे व अत्यंत आवश्यक असलेल्या सर्व टेस्ट मोफत करण्यात येणार आहे. याची नोंद घेण्यात यावी. हे शिबिर सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे सर्व नागरिकांनी तपासण्याकरिता उपाशी पोटी यावे ही विनंती. तिथे चहा नाष्टा याची सोय करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजुनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर व महिला व्यावसायिक संघटना कणकवली यांच्या अध्यक्षा सौ संजना काकडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!