नागरिकांना तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाची कर्करोग मोबाईल व्हॅन बुधवार ६ ऑगस्टला नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव येथे दाखल होणार आहे. ही व्हॅन या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत असणार आहे. या व्हॅन मध्ये कर्करोग तपासणीच्या विविध सुविधा उपलब्ध आहेत. यात मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय मुख कर्करोग या तपासण्या चा समावेश आहे.
दोन आठवड्यापेक्षा अधिक काळासाठी तोंड येणे तोंडामध्ये लाळ किंवा पांढरा चट्टा असणे, तोंड उघडायला त्रास होणे अशी मुख कर्करोगाची लक्षणे आहेत. मासिक पाळी व्यतिरिक्त योनीतून रक्तस्त्राव, मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्त्राव होणे, शारीरिक संबंधनंतर रक्तस्त्राव होणे, योनीमार्गातून दुर्गंधी युक्त स्त्राव होणे, गर्भाशय मुख कर्करोगाची तर स्तनामध्ये गाठ येणे स्तनांच्या आकारात बदल होणे स्तनग्रामधून पु किंवा रक्तस्त्राव होणे ही स्तन करकरोगाची रोगाची उदाहरणे आहेत. अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणीचा लाभ घ्यावा तपासणीला येताना रुग्णांनी आधार कार्ड व आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल आणावा, असे आव्हान ओरोस जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉक्टर श्रीपाद पाटील, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी आणि वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र नांदगाव यांनी केले आहे.












