‘महादेवी हत्तीण’ साठी ४५ किमी पदयात्रा; आंदोलकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल

नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा; ‘चले जाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘महादेवी हत्तीण’ परत मिळविण्यासाठी आज रवीवारी पहाटे पाच वाजल्यापासून नांदणी येथून निघालेली पदयात्रा सायंकाळीं पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोहचली. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेली ही पदयात्रा दिवसभरात ४५ किलोमीटर अंतर पार करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार आहे. दरम्यान पेटाच्या भूमिकेवर विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी संशय व्यक्त केला होता. यावरही बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी पेटाने वातावरण पेटू नये याची देखील काळजी घेतली पाहिजे जनभावनेचा देखील पेटाने आदर केला पाहिजे असे मत व्यक्त केल.

दरम्यान माध्यमांशी बोलल्या नंतर आंदोलकांशी चर्चा करण्या करीता गेलेले खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे याना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला. हे तिनही लोकप्रतिनिधी आत्मकलेश पदयात्रेत सहभागी न होता थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने आंदोलकांनी त्यांच्या समोरच चले जावच्या घोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

error: Content is protected !!